प्रसंग निघाला स्वभावें । बागेमध्ये काय लावावे ।
म्हणूनि घेतली नावे । काही एक ॥
कांटी रामकांटी फुलेकांटी । नेपती सहमुळी कारमाटी ।
सावी चीलारी सागरगोटी । हिंवर खैर खरमाटी ॥
पांढरफळी करवंदी तरटी । आळवी तोरणी चिंचोरटी ।
सिकेकाई वाकेरी घोंटी । करंज विळस समुद्रशोक ॥
अव्हाटी बोराटी हिंगणबेटी । विकळी टांकळी वाघांटी ।
शेर निवडुंग कारवेटी । कांटेशेवरी पांगेरे ॥
निरगुडी येरंड शेवरी । कासवेद कासळी पेरारी ।
तरवड उन्हाळ्या कुसरी । शिबी तिव्हा अंबोटी ॥
कांतुती काचकुहिरी सराटी । उतरणी गुळवेल चित्रकुटी
कडोची काटली गोमाटी । घोळ घुगरी विरभोटी ॥
भोंस बरु वाळा मोळा । ऊंस कास देवनळा ।
लव्हे पानि पारोस पिंपळा । गुंज कोळसरे देवपाळा ॥
वेत कळकी चिवारी । ताड माड पायरी पिंपरी ।
उंबरी अंबरी गंभिरी । अडुळसा मोही भोपळी ॥
साव सिसवे सिरस कुड । कोळ कुंभा धावडा मोड ।
काळकुडा भुता बोकडा । कुरंडी हिरंडी लोखंडी ॥
विहाळ गिळी टेंभुरणी । अवीट एणके सोरकिन्ही ।
घोळी दालचिनी । कबाबचीनी जे ॥
निंबारे गोडे निंब । नाना महावृक्ष तळंब ।
गोरक्षचिंच लातंब । परोपरीची ॥
गोधनी शेलवंटी भोंकरी । मोहो बिब्बा रायबोरी ।
बेल फणस जांब भरी । चिंच अंबसोल अंबाडे ॥
चांफे चंदन रातांजन । पतंग मैलागर कांचन ।
पोपये खलेले खपान । वट पिंपळ उंबर ॥
आंबे निंबे साखरनिंबे । रेकण्या खरजूरी तूंते दाळिंबे ।
तुरडे विडे नारिंगे । शेवे कविट अंजीर सीताफळे ॥
जांब अननस देवदार । सुरमे खासे मंदार ।
पांढरे जंगली लाल ।पुरे उद्वे चित्रकी ॥
केळी नारळी पोफळी । आवळी रायआवळी जांभळी ।
कुणकी गुगुळी सालफळी । वेलफळी माहाळुंगी ॥
भुईचांफे नागचांफे मोगरे । पारिजातक बटमोगरे ।
शंखासुर काळे मोगरे । सोनतरवड सोनफुले ॥
जाई सखजाई पीतजाई । त्रिविध शेवंती मालती जुई ।
पाडळी बकुळी अबई । नेवाळी केतकी चमेली ॥
सुर्यकमळिणी चंद्रकमळिणी । जास्वनी हनुमंतजास्वनी ।
केशर कुसुंबी कमळिणी । बहुरंग निळायाति ॥
तुळसी काळी त्रिसेंदरी । त्रिसिंगी रायचचु रायपेटारी ।
गुलखत निगुलचिन कनेरी । नानाविध मखमाली ॥
काळा वाळा मरुवा नाना । कचोरे गवले दवणा ।
पाच राजगिरे नाना । हळदी करडी गुलटोप ॥
वांगी चाकवत मेथी पोकळा । माठ शेपु खोळ बसळा ।
चवळी चुका वेल सबळा । अंबुजिरे मोहरी ॥
कांदे मोळकांदे माईणमुळे । लसूण आलें रताळें ।
कांचन कारिजे माठमुळे । सुरण गाजरें ॥
भोंपळे नाना प्रकारचे । लहानथोर पत्रवेलीचे ।
गळ्याचे पेढ्या सांगडीचे । वक्र वर्तुळ लंबायमान ॥
गंगाफळ काशीफळे क्षीरसागर । सुगरवे सिंगाडे देवडांगर ।
दुधे गंगारूढे प्रकार । किनऱ्या रुद्रविण्याचे ॥
वाळक्या कांकड्या चिवड्या । कोहाळे सेंदण्या सेंदाड्या ।
खरबूजा तरबुजा कलंगड्या । द्राक्षी मिरवेली पानवेली ॥
दोडक्या पारोशा पडवळ्या । चवळ्या कारल्या तोंडल्या ।
घेवड्या कुही-या खरमुळ्या । वेली अळूचमकोरे ॥
अठराभार वनस्पती । नामे सांगावी किती ।
अल्प बोलिलो श्रोतीं । क्षमा केली पाहिजे ॥
अश्विनी, हे तू लिहिलं आहेस? धन्य आहेस!वाचताना दमले पण तुझा ह्यावरचा अभ्यास लय भारी दिसतोय !
ReplyDeleteज्ञानात भर पडायला सत्तर वर्ष कमीच पडणार बहुतेक !
खूप छान !
बाग प्रकरण काय ते माहिती नाही
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
Deleteबाग प्रकरण: समर्थ रामदास परळी मठात वास्तव्यास होते त्यावेळी त्यांनी लिहिलेले हे काव्य आहे.
समर्थांचा व्यासंग आणि दिव्य प्रतिभा !!!
ReplyDelete🕉🙏🙏🙏
अश्विनीताई,धन्य झालो!आपला हा अभ्यास...
ज्ञानात भर पडायला एक आयुष्य खरंच कमीच पडणार!